Home राज्य महाराष्ट्रात रखडलेल्या पोलिस👮 भरती प्रक्रियेला आज सकाळपासून सुरुवात

    महाराष्ट्रात रखडलेल्या पोलिस👮 भरती प्रक्रियेला आज सकाळपासून सुरुवात

    257
    0

    पुणे दिनांक १९ जून (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या पोलिस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही पोलिस👮 भरती महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या पोलिस भरतीत प्रामुख्याने बॅड्समन. तुरुंग शिपाई. पोलिस शिपाई. व वाहन चालक या पदा करीता एकूण १७ हजार ४७१ पदा करीता ही पोलिस भरती होत आहे. दरम्यान आज पासून होणा-या या भरती प्रक्रियेत एकूण १७लाख ७६ हजार २५६ उमेदवार यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात एकूण ४०टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत. तर या भरती प्रक्रियेवर पावसाचे संकट आहे . दरम्यान अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. व आज देखील हवामान विभागाच्या वतीने पाऊसाचा अंदाज वर्तवला आहे. याचा परिणाम भरती प्रक्रिया वर परीणाम होणार आहे. दरम्यान या पोलिस भरती मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही गैरप्रकारावर विश्र्वास ठेऊ नये असे राज्य सरकारच्या वतीने कळविण्यात आले आहे.

    Previous articleचेन्नई-मुबंई इंडिगो विमान बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी एकच खळबळ
    Next articleअयोध्येत राम मंदिरात गोळी लागून सुरक्षा रक्षक जवानांचा मृत्यू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here