पुणे दिनांक २० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार ह्या राज्यसभेवर निवड झाल्यानंतर पहिल्याच वेळी त्या आज बारामती दौ-यावर आहेत.बारामतीच्या दौ-या दरम्यान त्या आज सहयोग या त्यांच्या बंगल्यावर त्या नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत.दरम्यान आज सकाळी ९ ते १३ वाजेपर्यंत त्या सर्वसामान्य नागरिकांना भेटणार आहेत.दरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांना खासदारकीची संधी देण्यात आली आहे.