Home Breaking News तामिळनाडूत विषारी दारु प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू तर ६० जणांची प्रकृती चिंताजनक;...

तामिळनाडूत विषारी दारु प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू तर ६० जणांची प्रकृती चिंताजनक; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

265
0

पुणे दिनांक २० जून (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) तामिळनाडू येथील कल्लकुरिची येथे विषारी दारु प्यायल्याने एकूण २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य ६० जण गंभीर रित्या असून त्यांच्या वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारी व पोलिस अधिक्षक  यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील दारुबंदी शाखेच्या पोलिसांसह इतर ९ पोलिसांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान या घटने संदर्भात सूत्रांन कडून मिळालेल्या माहितीनुसार विषारी दारु विक्रेता याला अटक करुन त्याच्या कडून २०० लिटर दारु जप्त करण्यात आली आहे. या विषारी दारुत घातक मिथेनाॅल आढळून आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या विषारी दारु पिऊन मृत्यू झालेल्या घटना बद्दल दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान यात कल्लकुरिच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी एम एस प्रशांत यांनी भेट घेतली होती. दरम्यान या घटनेनंतर राज्य सरकारने कडक पाऊले उचलत मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सदर विषारी दारु प्रकरणी या घटनेची सखोल चौकशी तपासासाठी सीबी-सीआयडी तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर कल्लकुरिचे  जिल्हा दंडाधिकारी श्रावण कुमार जटावथ यांची तातडीने बदली केली आहे. तर  पोलिस अधीक्षक समय सिंह मीना यांना निलंबित करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील दारुबंदी शाखेच्या पोलिस व इतर ९ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान विषारी दारु प्यायल्याने ६० जण गंभीर असून त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Previous articleरायगडावर तिथीनुसार आज ३५१वा शिवराज्याभिषेक सोहळा
Next articleखासदार सुनेत्रा पवार यांचा आज बारामती दौरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here