Home क्राईम पुण्यात पाण्याच्या टॅंकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळला एकच खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल

  पुण्यात पाण्याच्या टॅंकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळला एकच खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल

  579
  0

  पुणे दिनांक २० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील फुरसुंगी भागात पाॅवर हाऊस जवळ टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या एका टॅंकरमध्ये एका महिलाचा मृतदेह आढळून आला आहे.त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.सदरची महिला ही कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारी असल्याची माहिती मिळत आहे.मृत महिलेचे नाव कौशल्य मुकेश चव्हाण ( रा.जेएसपीएम काॅलेज जवळ उंड्री) असे आहे.

  दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी कोंढवा येथून एक टॅंकर पाणी भरण्या करीता फुरसुंगी येथील पाॅवर हाऊस येथे आला होता. दरम्यान टॅंकरमध्ये पाणी भरताना ते पाणी मध्येच आडले असता यावेळी टॅंकरच्या चालकाने टॅंकरमध्ये खाली उतरून पाहिले असता त्याला टॅंकरमध्ये महिलेचा मृतदेह दिसला त्याला मृतदेह बघताच धक्का बसला त्यांने याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात माहिती दिली.हडपसर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.व सदरचा टॅंकर हा कोंढवा येथून आलेला असल्याने याबाबत कोंढवा पोलिसांना याची माहिती कळवली त्यानंतर कोंढवा पोलिसांनी संबंधित महिले ची ओळख पटवली त्यानंतर सदरचा मृतदेह हा पोस्टमार्टम करीता ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

  Previous articleभाजप व पंतप्रधान मोदी यांच्यावरील लोकांच्या मनातील विश्र्वासाला तडा गेला आहे, जेष्ठ नेते शरद पवार
  Next articleदिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना दारु घोटाळा प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here