पुणे दिनांक २१जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील कल्याणीनगर येथे १९ मे रोजी भीषण अपघात झाला होता.बिल्डर व्यावसायिक असलेल्या उद्योजकाच्या मुलाने भरघाव वेगाने पोर्शे कार चालवत दोघा आय टी इंजिनियर युवक व युवतीचा जीव घेतला होता.आज न्यायालयाने या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांना जामीन मंजूर केला आहे.
मुलगा अल्पवयीन असताना देखील त्याला पोर्शे कार चालविण्यासाठी दिली.तसेच अल्पवयीन मुलाने पब मध्ये मित्रांसमवेत दारु पार्टी केली होती.व त्यांचे ब्लड सॅम्पल नाॅर्मल त्याच दिवशी आले होते.व त्याला त्याचं दिवशी जामीन मिळाला होता.दरम्यान ससून रुग्णालयात सॅम्पल साठी वापरलेले बल्ड हे त्यांच्या आईचे होते.असे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना देखील यात अटक करण्यात आली होती.आज पुणे सत्र न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना अटी व शर्ती तसेच या खटल्यात तपास पथकाला सहकार्य करण्याच्या शर्तीवर जामीन मंजूर केला आहे.