पुणे दिनांक २२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत आणि बांगलादेश यांच्यात आज सुपर ८ चार सामना खेळला जात असून या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर १९७ धावांचे आव्हान ठेवले आहे.भारताकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने ३७ ,रिषभ पंतने ३६,शिवम दुबेने ३४ तर हार्दिक पांड्याने ५० धावांची खेळी केली आहे.यात बांगलादेशकडून रिशद हुसेनने दोन आणि साकिबने दोन विकेट घेतल्या आहेत.आजच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.