Home Breaking News पिंपरी चिंचवड शहराला पावसाने झोडपले,११४ मिलिमीटर पाऊसाची नोंद

पिंपरी चिंचवड शहराला पावसाने झोडपले,११४ मिलिमीटर पाऊसाची नोंद

472
0

पिंपरी -चिंचवड दिनांक २२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पिंपरी -चिंचवड शहरात आज रविवारी सायंकाळी मुसाळधार पाऊस झाला आहे.या पावसाने अनेक भागात पाणी साचले आहे.तर काही ठिकाणी घरात पाणी गेले.काही ठिकाणी झाडे पडले आहेत.या पावसाने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.अवघ्या काही वेळात ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान आज पिंपरी -चिंचवड शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते.अचानकपणे सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.यात मुसाळधार पाऊस झाला आहे.शहरातील सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.तर काहीजणांच्या घरात या पावसाचे पाणी गेल्याने त्यांची एकच तारांबळ झाली पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला तर काही ठिकाणी इंटरनेट सेवा विस्कळित झाली व त्यामुळे अनेकांच्या कामाचा खोळंबा झाला आहे.तर या मुसळधार पावसाने आकुर्डी येथील सुखवाणी प्लाझा या सोसायटी मधील भिंत कोसळली व ती कारवर पडल्याने कारचे नुकसान झाले आहे.तर पिंपरी मधील मोहननगर येथील बसवेश्वर चौकात झाड पडण्याची घटना घडली आहे. सदरचे झाड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बाजूला घेतले आहे.

Previous articleअलिबाग येथील तलावात बुडून दोन जणांचा मृत्यू
Next articleपुणे सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात ट्रकचा अपघात, महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here