Home Breaking News पुणे ते नाशिक महामार्गावर भीषण अपघात,आमदाराच्या पुतण्याने दोन जणांना कारखाली चिरडलं

पुणे ते नाशिक महामार्गावर भीषण अपघात,आमदाराच्या पुतण्याने दोन जणांना कारखाली चिरडलं

416
0

पुणे दिनांक २३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने कारखाली दोन जणांना चिरडल्याची घटना काल शनिवारी रात्री एकलहरे गावाजवळ घडली आहे.यात एकाचा घटना स्थळीच मृत्यू झाला आहे.तर दुसरा गंभीर रित्या जखमी झाला आहे.या अपघात प्रकरणी कार चालक याला पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान या अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली व परिस्थिती आटोक्यात आणली सदर अपघात प्रकरणी रात्री उशिरा आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्या वर गुन्हा करुन त्याला अटक केली आहे.या अपघातात दुचाकीस्वार ओम भालेराव (वय १९) यांचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकी वरील दुसरा एकजण गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर अपघात प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार चालकांचे नाव मयूर मोहिते असे आहे.दरम्यान या अपघात प्ररकणी पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर हा पुणे ते नाशिक महामार्गावर विरूद्ध दिशेने भरधाव वेगाने कार चालवत होता त्यावेळी समोरुन येणां-या दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार हे हवेच उडाले.त्यातील दुचाकीस्वार ओम याच्या छातीला व डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.तर अन्य दुसरा गंभीर रित्या जखमी झाला आहे.तर अपघातानंतर कार चालक याने कोणत्याही प्रकारची दयामाया न दाखवता व अपघातात जखमी झालेल्यांना मदत न करता कार मध्ये बसून राहिला होता.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बचावकार्य सुरू केले . दरम्यान मृत तरुणांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.रात्री उशिरा कार चालक मयूर मोहिते याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान अपघात करणारा कार चालक याने मद्यपान केले होते का? पोलिस या प्रकरणी शोध घेत आहेत.तर या अपघातानंतर खेडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप मोहिते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की.माझा पुतण्या याने मद्यपान केले नव्हते.तसेच तो विरुद्ध दिशेने कार चालवत नव्हता तर दुचाकीस्वार हे पाठीमागून येवून कारला जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.व माझा पुतण्या अपघाता नंतर पळून गेला नव्हता तर पोलिस ठाण्यात हजर झाला होता.मी या अपघातात पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नाही.आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहे.पोलिस तपासात अपघात प्रकरणी सर्व बाजू पुढे येईल असे ते म्हणाले आहेत.
Previous articleभारताचे बांगलादेशसमोर १९७ धावांचे आव्हान
Next articleपुण्यात एफ सी रोडवरील नामांकित हाॅटेल मध्ये ड्रग्स विक्री,राज्याची संस्कृती बनली ड्रग्स संस्कृती?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here