Home क्राईम पुणे सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात ट्रकचा अपघात, महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली

  पुणे सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात ट्रकचा अपघात, महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली

  366
  0

  पुणे दिनांक २२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे ते सातारा महामार्गावर असलेल्या खंबाटकी घाटात उतारावर एक विचित्र असा अपघात झाला असून यात एक कंटेनर वेळे गावच्या हद्दीत महामार्गावरच आडवा झाला आहे.त्यामुळे या महामार्गावरीव वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.व वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगाच रांगा लागल्या आहेत.

  दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते सातारा महामार्गावर खंबाटकी घाट उतरल्यावर वेळेस गावाच्या हद्दीत पावसामुळे निसरड्या झालेल्या रोडवर उतारावर कंटेनर क्रमांक एम‌ एच ०९ एफ एल ११०५ हा ड्रायव्हरचा कंटेनर वरील ताबा सुटल्याने जागेवरच फिरुन अडवा झाला आहे.त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.अशी माहिती मिळत आहे.

  Previous articleपिंपरी चिंचवड शहराला पावसाने झोडपले,११४ मिलिमीटर पाऊसाची नोंद
  Next articleपुणे पब ड्रग्स प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशन मधील दोन पोलिस अधिकारी यांचे निलंबन

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here