Home Breaking News पुण्यातील ग्रामीण भागात चार जणांचे अपहरण कोयत्याने मारहाण, महाराष्ट्राचा बिहार झालाय का?

पुण्यातील ग्रामीण भागात चार जणांचे अपहरण कोयत्याने मारहाण, महाराष्ट्राचा बिहार झालाय का?

472
0

पुणे दिनांक २४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे पैशाच्या वादातून १० ते १५ जणांनी मिळून एका कुटुंबातील चार जणांचे अपहरण करून त्यांना कोयता व लाठ्याकाठ्या व कोयत्याच्या सहाय्याने मारहाण करून उलटं टांगून अमानुषपणे मारहाण केल्याची भयानक घटना घडली आहे.दरम्यान यात मारहाण करणाऱ्या हे नातेवाईक असल्याचे समजते.हा सर्व प्रकार हा उसने घेतलेल्या 💸 पैशावरुन झाला आहे.अशी माहिती मिळत आहे. दरम्यान या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी 👮 अज्ञात १० ते १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.तसेच यातील आरोपी यांचा शोध शिक्रापूर पोलिस करत आहेत.दरम्यान ही घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर भागात घडली आहे.या घटनांमुळे यातील कुटुंब हे भयभीत झाले आहे.पैशांच्या वादातून चार जणांचे अपहरण करून त्यांना अमानुषपणे मारहाण केल्यांने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पुणे जिल्हा हा महाराष्ट्राचा बिहार झालाय का?असा प्रश्न आता सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.

Previous articleपुणे पब ड्रग्स प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशन मधील दोन पोलिस अधिकारी यांचे निलंबन
Next articleपुण्यातील फर्ग्युसन रोडवरील ‘एल३-लिक्विड लीजर लाउंज ‘ या पबची तोडफोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here