Home Breaking News पुण्यातील ड्रग्स प्रकरणाती ८ आरोपींना २९ जून पर्यंत पोलिस कस्टडी

पुण्यातील ड्रग्स प्रकरणाती ८ आरोपींना २९ जून पर्यंत पोलिस कस्टडी

45
0

पुणे दिनांक २४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील ‘एल ३-लिक्डिड लीजर लाउंज ‘ बार पार्टी प्रकरणी पुणे पोलिसांनी आठ जणांना अटक करण्यात आली होती.आज पुणे पोलिसांनी त्यांना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.त्यांना न्यायालयाने २९ जून पर्यंत पोलिस कस्टडी सुनवली आहे.सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

दरम्यान आज सत्र न्यायालयात पुणे पोलिसांनी या आठ आरोपींना हजर करुन पोलिसांनी सात दिवसांची आरोपींची कस्टडी मागितली होती.त्या नंतर न्यायालयाने २९ जून पर्यंत पोलिस कस्टडी सुनवली आहे.दरम्यान ‘ एल३ -लिक्किड लीजर लाउंज ‘ मध्ये झालेल्या पार्टीची माहिती समोर आल्यानंतर पुण्याचे ड्रग्स कनेक्शन उघड झाले आहे.या पार्टीत अल्पवयीन मुलाचा समावेश होता.याचा तपास पुणे गुन्हे शाखेचे पोलिस तपास करीत आहेत.सोशल मिडिया मार्फत या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या बारचे बील हे ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आले आहे.दरम्यान या पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन करण्यात आले.त्या मुलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे.तसेच सी सी टिव्ही मध्ये दिसणा-या तरुणांना सुध्दा याच आरोपींना त्या बार मध्ये बोलावले होते.यातील दोन आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी 👮 न्यायालयात दिली आहे.यातील सचिन कामठे या युवकाचा शोध पुणे पोलिस घेत आहेत.

Previous articleसंभाजीनगर मध्ये मराठा आंदोलक आक्रमक रमेश तारख यांना फासले काळे
Next articleपुण्यातील माॅलच्या टाॅयलेट मध्ये दोन तरुणी ड्रग्स ओढतानांचा व्हिडिओ व्हायरल,’पुणे नगरी झाली ड्रग्स नगरी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here