पुणे दिनांक २४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार संभाजी नगर मध्ये आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले आहे.मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी मधील उपोषणाला डॉक्टर तारख यांनी विरोध केला होता.व तसा अर्ज जालना जिल्हा प्रशासनाला दिला होता. अंतरवाली सराटीत उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे गावात गर्दी होते.व ट्राफिक जाम होते.त्यामुळे गावातील ग्रामस्थ यांना त्रास होतो. त्यामुळे त्यांच्या उपोषणाला व आंदोलनाला परवानगी देऊ नये.अशी मागणी डॉक्टर रमेश तारख यांनी केली होती.