पुणे दिनांक २६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसेच शिक्षक. कोकण पदवीधर व नाशिक शिक्षक अशा एकूण चार मतदार संघात आज मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे.दरम्यान पदवीधारकांना व शिक्षक यांना मतदानाबाहेर व मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे आव्हान सर्वच उमेदवारांना आहे.दरम्यान या मतदाना करीता पदवीधर व शिक्षक मतदारसंघात नोंदणी केलेल्या मतदारांना मतदान करण्याचा हक्क आहे.व अशाच लोकांना मतदानाचा हक्क बजवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने विशेष सुट्टी देण्यात आली आहे.
दरम्यान आज या विधानपरिषदेच्या चार जांगाकरीता दोन शिक्षक व दोन पदवीधर मतदारसंघ आहेत.यात कोकण.व मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा या चार मतदारसंघात ही निवडणूक पार पडत आहे.त्यासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.यात नाशिक मतदारसंघात संदीप गुळवे -ठाकरे गट . किशोर दराडे -शिंदे गट व वकिल महेंद्र भावसार -अजित पवार गट .तर विवेक कोल्हे -अपक्ष यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे.तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे यांच्या समोर काॅग्रेसचे रमेश किर हे उमेदवार रिंगणात आहेत.तर मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे ठाकरे अनिल परब व भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होत आहे.