Home Breaking News आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू,विरोधीपक्षाचे वादळ विधीमंडाळात धडकणार

आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू,विरोधीपक्षाचे वादळ विधीमंडाळात धडकणार

336
0

पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुरुवार दिनांक २७ जून पासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून.दरम्यान या आजच्या पावसाळी अधिवेशनात अनेक वादळी मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सत्ताधारी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच वरिष्ठ नेतेमंडळी यांनी खास रणनीती आखली आहे.यात मागील काही काळात पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात.तसेच पुण्यातील वाढते ड्रग्स प्रकरण तसेच पुण्यातील पब राज्यातील दुष्काळी परिस्थिती.तसेच राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन झालेले शेतकऱ्यांचे नुकसान.शेतक-यांची कर्जमुक्ती.तसेच शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीच्या मुद्द्यांवर विरोधक आवज उठविण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सकाळ पासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच काल उध्दव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांची एक बैठक एका हाॅटेल मध्ये घेऊन यावेळी त्यांनी सर्व आमदारांना पूर्णवेळ सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच पुणे पोर्शे अपघात.पुणे पब मधील ड्रग्स प्रकरण . होर्डिंग्ज दुर्घटना या सर्व मुद्यांवर सत्ताधारी सरकारला घेरा.तसेच सत्ताधारी आमदार यांना देण्यात आलेल्या अधिक निधी विरोधात आक्रमक पवित्रा घ्या.तसेच राज्यातील शेतकरी व विद्यार्थ्यांच्या विषयांवर सरकारला प्रक्ष्न विचरा तसेच नीट परीक्षात झालेला भ्रष्टाचार.हे सर्व मुद्यांवर सत्ताधारी सरकारला घेरा अशा सुचना आपल्या सर्व आमदारांना दिल्या आहेत.तसेच शरद पवार गटाचे आमदार व काॅग्रेस पक्षाचे आमदार आज सत्ताधारी सरकारवर तुटून पडणार आहे.एकंदरीत आज विरोधी पक्षाचे वादळ आज पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने हाऊस मध्ये धडकणार आहे.

Previous articleआज भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात सेमीफायनल
Next articleविधानभवनाच्या पाय-यांवर विरोधकांचे आंदोलन सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here