Home क्राईम मुंबई ते पुणे महामार्गावर लुटमार करणारी टोळी गजाआड,पावने सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

    मुंबई ते पुणे महामार्गावर लुटमार करणारी टोळी गजाआड,पावने सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

    365
    0

    पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई ते पुणे महामार्गावर दरोडा टाकून वाहन चालकांची लुटमार करणारी टोळीच्या पनवेल तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.यात चौघांचा समावेश आहे.त्यांच्या कडुन लुटमारीत लुटलेले एकूण ५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दरम्यान या टोळीकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते पुणे महामार्गावर पळस्पे गावात घ्या हद्दीत मालवाहतूक चालक गाडीचे टायरची हवा तपासणी करत असताना ५ ते ६ जणांच्या टोळक्याने यावेळी हल्ला करून रोकड व मोबाईल फोन चोरी झाल्याची घटना घडली होती.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना या टोळी बाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी छापेमारी करून या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.सदर कारवाईत २१ मोबाईल.व ५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    Previous articleमराठा आरक्षण आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
    Next articleउध्दव ठाकरे व देवेंद्र फडणवीस लिफ्टची वाट पाहताना एकत्र

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here