पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलीक खाडे यांची एक ऑडिओ कील्प व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या पंकाजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी आज सायंकाळी जालना रोडवर असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाच्या जिल्हाप्रमुख असलेले कुंडलीत खाडे यांचे ऑफिस फोडले आहे.दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतप्त झालेल्या पंकाजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी खाडे यांच्या ऑफिस वर तुफान दगडफेक केली.तसेच ऑफिस मध्ये प्रवेश करुन ऑफिसची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे.आज व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लीप मध्ये जिल्हाप्रमुख कुंडलीक खाडे हा पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या बाबत बोलताना दिसत आहे.
दरम्यान या ऑडिओ क्लीप मध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पंकाजा मुंडे यांच्या विरोधात काम केल्याचे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलीक खाडे यांनी मान्य केले आहे.तशी एक ऑडिओ क्लीप सध्या आज मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हाप्रमुख कुंडलीक खाडे एका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याशी बंजरंग सोनवणे यांना कशी मदत करायाची हे सांगत आहे.तर दुसऱ्या क्लीप मध्ये म्हाळसा जवळा या खाडेच्या गावातून पंकाजा मुंडे यांना मुद्दामून लीड दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आज या नंतर संतप्त झालेल्या पंकाजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख यांचे ऑफिस जालना रोडवरील तोडल्यानंतर यावर अद्याप जिल्हा प्रमुख खाडे यांनी प्रतिक्रिया दिली नाही.