Home आध्यामिक इंद्रायणी नदीचा काठ वारकऱ्यांनी फुलला! संत तुकाराम महाराज पालखीचे आज दुपारी प्रस्थान

इंद्रायणी नदीचा काठ वारकऱ्यांनी फुलला! संत तुकाराम महाराज पालखीचे आज दुपारी प्रस्थान

350
0

पुणे दिनांक २८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दुपारी दोन वाजता देहू येथून पंढरपूर कडे प्रस्थान ठेवणार आहे.त्यामुळे मुख्य देऊळवाड्या तील भजनी मंडपाला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.टाळ मृदुंग व विठुनामा च्या घोषात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काल गुरुवारी अनेक दिंड्या दाखल झाल्या आहेत.इंद्रायणी नदीचा काठ हा भाविकांच्या व वारकऱ्यांच्या गर्दीने फुलला असून आज सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्व वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

दरम्यान पंढरीच्या सावळ्या विठुरायाला भेटायला आतूर झालेले वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.दरम्यान मुख्य देऊळ वाड्यात गुरुवारी पहाटे पासून वारकऱ्यां नी दर्शना करीता मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. दरम्यान देहू नगरपंचायतीच्या वतीने सोहळ्यातील भाविकांना विविध सोयी- सुविधा मिळाव्यात म्हणून संपूर्ण तयारी केली आहे.पालखी मार्गावर देहू ते देहूरोड दरम्यान रस्त्यावर असलेले खड्डे बुजविण्यात आले आहे.तसेच देहुरोड बोर्डाच्या वतीने भाविकां साठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहे.तसेच शनि मंदिरा जवळ पहिल्या विसावा ठिकाणी मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्रातून विविध भागांतून मानकरी व सेवेकरी दाखल झाले आहेत.दरम्यान पालखी सोहळ्यातील मानाचे अश्र्व‌ रथाला जुंपण्यात येणारी बैलजोडी देहू गावात दाखल झाल्याचे पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे.माणिक महाराज मोरे.व संतोष महाराज मोरे यांनी सांगितले आहे.दरम्यान वारकरी यांना पाणी पिण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने १० पाण्याचे टँकर देहू मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.तसेच देहू नगरपंचायतीच्या वतीने २४ तास पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.दरम्यान वीज वितरण कंपनीचे कर्मचारी देहूत तळ ठोकून आहेत.तसेच देहूत येणाऱ्या वारकऱ्यांच्या साठी अन्नदानाची सोय संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळ व‌ इस्कॉन यांच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान नगरपंचायत देहू प्रशासनाच्या वतीने निर्मल वारीचे आयोजन करण्यात आले आहे.त्यासाठी देहूत १ हजार १०० स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षा साठी देहूत चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्या करीता एकूण ५०० पोलिस कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

Previous articleभारताचा ६८ धावांनी इंग्लंडवर विजय , फायनल मध्ये धडक
Next articleआज हाऊसमध्ये राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार सादर करतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here