पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आमदार निधिसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांना तब्बल ५० पत्रे लिहिली.व ५० फोन केले.पण अजित पवार यांनी आपलेल्या भेटीसाठी वेळ दिला नाही.अशी खंत आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सदनात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले की.तुमच्या कार्यकर्ते यांना द्या.पण इतर आमदारांना कटोरा घेऊन उभे राहू देऊ नका . उद्या तुमचे सरकार गेले तर तुम्ही देखील आमदार म्हणून राहणार आहात.दरम्यान मतदार संघाच्या विकास निधी साठी अर्थमंत्र्यांची भेट घ्यावी लागते.पण मला दादा भेटच देत नाहीत.असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.यावर उत्तर देताना अमोल मिटकरी म्हणाले की.आमदार जितेंद्र आव्हाड यांना हळद्या रोग झाला आहे.त्यांना सतत दादा दिसतात असे म्हटले आहे.