पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात अल्पवयीन मुलाने भरघाव वेगाने टॅंकर चालवत अनेक जणांना उडवले. झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पती व पत्नीसह अनेकजण जखमी झाले आहेत.जखमीमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. यातील जखमींना भारती हाॅस्पीटलमध्ये उपचार करीता दाखल करण्यात आल्याबाबतची माहिती मिळत आहे.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून समजते की पुण्यातील वानवडी भागात आज पहाटेच्या सुमारास शनिवारी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने पाण्याचा टँकर भरघाव वेगाने चालवत एका दुचाकी स्वाराला उडवलं आहे.दुचाकी स्वार पती व पत्नी यांचा यात समावेश आहे.दुचाकीस्वार पुणे म.ना.पा.चे अधिकारी संतोष ढुमे हे पत्नी सह दुचाकी वरून जात होते.त्यावेळी हा अपघात झाला आहे. दरम्यान या टॅंकरने अन्य लहान मुलांना देखील धडक दिल्याचे समजत आहे.दरम्यान या अपघाता नंतर १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.या अपघात बाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.तसेच त्याच्या वडिलांना देखील ताब्यात घेतले असून या प्रकरणी वानवडी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.