Home Breaking News बारामतीमधील निंबुत गोळीबार मधील जखमी रणजित निंबाळकर यांचा पुण्यातील रुबी हॉल हाॅस्पीटलमध्ये...

बारामतीमधील निंबुत गोळीबार मधील जखमी रणजित निंबाळकर यांचा पुण्यातील रुबी हॉल हाॅस्पीटलमध्ये मृत्यू

111
0

पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील निंबुत येथे बैलगाडी शर्यतीमधील बैल विक्रीच्या पैशांच्या व्यवहाराच्या वादातून राजकीय पुढाऱ्यांच्या मुलाने गोळीबार केला यात रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी झाडल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल हाॅस्पीटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती.परंतू उपचारा दरम्यान आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे.या गोळीबार प्रकरणी राजकीय पुढाऱ्यांसह त्यांच्या मुलांना बारामती पोलिस यांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या गोळीबार प्रकरणी बारामती पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार सोमेश्वर साखर कारखानाचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांच्या मुलाने फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्याकडून शर्यतीचा बैल ३७ लाख रुपयांना विकत घेतला व या व्यापारातील फक्त ५ लाख रुपये काकडे यांनी निंबाळकर यांना दिले होते उर्वरित राहिलेल्या ३२ लाख रुपये घेण्यासाठी रणजित निंबाळकर हे त्यांच्या गावातील अन्य लोक घेऊन काकडे यांच्या निंबुत गावात काकडे यांच्या घरी गेले असता व्यवाहाराच्या वादातून गैरव काकडे यांनी गोळीबार केला यात रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागून ते जखमी झाले त्यांना उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.नंतर पुढे त्यांना अधिक उपचारा करीता पुण्यातील रुबी हॉल हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते.तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.दरम्यान उपचारा दरम्यान आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान या गोळीबार प्रकरणी रणजित निंबाळकर यांच्या पत्नी यांनी बारामती पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी 👮 सोमेश्वर साखर कारखानाचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे व त्याचे दोन मुले गौरव काकडे व गौतम काकडे यांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान आज पहाटे रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर बारामती पोलिसांनी अर्म अॅक्ट व खून प्रकरणी काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान आज रणजित निंबाळकर यांच्या मृत्यूनंतर फलटण तालुक्यात सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.ही गोळीबाराची घटना दिनांक २७ जून रोजी बारामती येथील निंबुत गावात काकडे यांच्या घरासमोर घडली होती.

Previous articleशर्यतीचा बैल व्यवहारातून वाद, बारामतीत गोळीबार एकजण गंभीर जखमी
Next articleपुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून भीषण अपघात,मुलाने टॅंकर चालवत पती-पत्नीसह अनेकांना उडवलं जखमींना भारती हाॅस्पीटलमध्ये दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here