पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) टि-२० वर्ल्ड कप फायनल मध्ये आज विराट कोहलीने चांगली फलंदाजी केली आहे.त्यांने आज ७६ धावा केल्या आहेत.तर अक्षर पटेलने ४७ धावा केल्या आहेत.आज प्रथम फलंदाजी करताना कॅप्टन रोहित शर्मा व ऋषभ पंत हे एकाच ओव्हर मध्ये लागोपाठ कॅच आऊट झाले आहेत.त्यानंतर फलंदाजी साठी आलेल्या सुर्यकुमार यादव देखील स्वस्तात बाद झाला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिका समोर १७६ धावांचे लक्ष ठेवले आहे.