पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार सुरू आहे.येत्या १० दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्रेकिंग न्यूज देतील अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.राज्य सरकारला मराठा आरक्षण बाबतचा विषय संपावयाचा आहे.कुणीही राजकारण करणार.त्यांच्या राजकरणाशी मला देणे-घेणे नाही. दरम्यान ओबीसी बांधवांवर अन्याय न करता मराठा बांधवांना कायद्याच्या चौकटीत टीकेल असे आरक्षण दिले जाईल.असे देखील यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.