पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लडाखमध्ये लष्करी सराव करताना टॅंक नदी ओलांडताना झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे एकूण पाच जवान शहीद झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे.सर्व शहिद जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करुन.मी शोकसंतप्त कुटूंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो.या दु:खाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.तसेच त्यांचे समर्पण.सेवा आणि बलिदान देश सदैव स्मरणात ठेवेल .असेही म्हटले आहे.