Home Breaking News संपूर्ण भारतभर गाजलेल्या नीट घोटाळ्या प्रकरणी सीबीआयचे ७ ठिकाणी छापेमारी

संपूर्ण भारतभर गाजलेल्या नीट घोटाळ्या प्रकरणी सीबीआयचे ७ ठिकाणी छापेमारी

54
0

पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण भारतात गाजलेल्या नीट परीक्षा मधील घोटाळ्या प्रकरणी गुजरात राज्यातील एकूण सात ठिकाणी आज सीबीआयच्या वतीने छापेमारी करण्यात आली आहे.यात आज प्रामुख्याने गोध्रा. व खेडा.आनंद.अहमदाबाद या जिल्ह्यात छापेमारी करण्यात आली आहे.तर आज या प्रकरणी झारखंड येथील हजारीबाग येथून एका पत्रकाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.दरम्यान या पत्रकाराने मुख्याध्यापक व सीबीआयच्या ताब्यात असलेल्यांना मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.आता ग्राऊंड लेव्हलवर तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर यातील सर्व आरोपींना दिल्लीत आणले जाणार आहे.

दरम्यान या नीट परीक्षा मध्ये घोटाळा झाल्यानंतर यांचे पडसाद संपूर्ण भारतात उमटले होते.अनेक राज्यात विरोधी पक्षनेते व विध्यार्थी संघटना तसेच विद्यार्थी हे रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले होते.या आंदोलन नंतर केंद्र सरकारला जाग आली व केंद्र सरकारच्या वतीने नवीन कायदा अंमलात आणला आहे.दरम्यान यांचे पडसाद केंद्रात पावसाळी अधिवेशन सुरू असून सदनात देखील विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी हा नीटचा मुद्दा उपस्थित केला आहे.तसेच या नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनात काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारला धारेवर धरले होते.

Previous articleअरविंद केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीन कस्टडी
Next articleभारतीय संघाने नाणेफेक जिंकली करणार फलंदाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here