Home Breaking News समृद्धी महामार्गावर दोन कारची समोरासमोर भीषण धडक,६ जण घटनास्थळीच ठार अन्य ४...

समृद्धी महामार्गावर दोन कारची समोरासमोर भीषण धडक,६ जण घटनास्थळीच ठार अन्य ४ जण जखमी

117
0

पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार समृद्धी महामार्गावर आज शनिवारी पहाटेच्या सुमारास दोन कारचा भीषण अपघात झाला आहे.यात दोन्ही कार भरघाव वेगाने येत असताना समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन्ही कार मधील ६ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.तर कार मधील अन्य ४ जण हे गंभीररीत्य जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर यातील जखमीतील दोन जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे.तर अपघातामधील मृतांची ओळख पटविण्याचे काम पोलिस करत आहेत.

दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून समजते की.नागपूर वरुन मुंबईकडे जाणाऱ्या कारने राॅंग बाजूने येणाऱ्या कारला धडक दिल्याने हा अपघात जालना येथील कडवंची गावाजवळ घडला आहे.दरम्यान यातील दोन्ही कारचा वेग जास्त असल्याने झालेल्या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही कारचा सापळा शिल्लक राहिला आहे.यात ६ जण ठार झाले असून.यातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील ४ जखमी पैकी दोन जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे.यातील मृतांचे मृतदेह हे पोस्टमार्टम करीता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस यातील मृतांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.दरम्यान समृद्धी महामार्ग हा आता अपघाताचा महामार्ग झाला आहे.दरम्यान या अपघाता नंतर अनेकजण हळहळ व्यक्त करत होते.

Previous articleपुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून भीषण अपघात,मुलाने टॅंकर चालवत पती-पत्नीसह अनेकांना उडवलं जखमींना भारती हाॅस्पीटलमध्ये दाखल
Next articleव्हायरल ऑडिओ क्लिपनंतर शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलीक खाडे यांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here