पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय क्रिकेट संघाने आज टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनल मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ आमनेसामने आले होते.या सामन्यात फलंदाजांनी दमदार कामगिरी तसेच गोलंद दांजांच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ट्राॅफीवर सोनेरी अक्षरांनी आपले नाव कोरले आहे.दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी भारताने करून हा सामना जिंकण्यासाठी १७७ धावांचे लक्ष्य दिले होते.दरम्यान या धावांचा पाठलाग करताना १७० धावाच दक्षिण आफ्रिका संघाने केल्या होत्या. भारताने हा सामना ७ धावांनी जिंकला आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना क्विंटन डीकाॅकने आक्रमक सुरुवात केली होती.त्यांने ३१ चेंडूत ३९ धावा केल्या होत्या.तर रिजा हेंड्रिक्सने ४ धावा आणि कॅप्टन एडेन मार्करमने ४ धावा करत तंबूत परतला त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने ३१ धावांचे योगदान दिले तर शेवटी हेनरिक क्लासेनने २७ चेंडूत ५२ धावा केल्या तो आक्रमक खेळत असताना त्यांनी एक षटकार मारला पण सीमारेषावर सुर्यकुमार यादव ने झेल घेतला.खरी ही मॅच इंडियाचा हातात आली होती.व इंडियाने फायनल मध्ये टी-२० ची ट्राॅफी आपल्या नावावर केली आहे.