Home Breaking News बीड जिल्ह्यातील परळीत गोळीबार, अजित पवार गटाच्या सरपंचाचा जागीच मृत्यू तर दोन...

बीड जिल्ह्यातील परळीत गोळीबार, अजित पवार गटाच्या सरपंचाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर रित्या जखमी

64
0

पुणे दिनांक ३० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गोळीबार झाला असून सदरची धक्कादायक घटना ही येथील बॅंक काॅलनीत घडल्याची माहिती मिळत आहे.या गोळीबारात मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव बापू अंधाळे असे आहे.ते मरळवाडीचे सरपंच आहेत.दरम्यान या गोळीबारात अन्य दोनजण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

दरम्यान या गोळीबाराप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या गोळीबारात ग्यानबा मारुती गिते व  महादेव गिते हे जखमी झाले असून या दोघांवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयत उपचार सुरू आहेत.दरम्यान हा गोळीबार कोणी व कशासाठी केला.व कुणावर गोळी झाडली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.दरम्यान सदरची घटना घडल्या नंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Previous articleटी-२० वर्ल्डकप जिंकल्यावर भारतीय संघाच्या सर्वच खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू!
Next articleलग्नासाठी निघालेल्या कुटूंबांवर विघ्न,कार अपघातात आईसह डॉक्टर मुलाचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here