पुणे दिनांक ३० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे.मागील तीन दिवसांपासून पावसाला मुंबईत चांगली सुरुवात झाली आहे.दरम्यान आता मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे.तर सोमवारी मुंबई साठी अतिवृष्टीचा अंदाज असून हवामान विभागाच्या वतीने मुंबई साठी ‘ रेड अलर्ट ‘ चार इशारा दिला आहे. तर यामुळे.चाकरमानी व प्रवासी वर्गाला यांचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे.तर पुण्याला देखील यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान आज महाराष्ट्रात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.पुण्यात आज अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता आहे.व तसा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.तसेच पुणे व रायगड.रत्नागिरी जिल्ह्यासाठी यलो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पुढील काही तासांमध्ये अतिमुसाळधार पाऊसाचा अंदाज आहे.पालघर.ठाणे. मुंबई.सातारा.या जिल्ह्यात अतिमुसाळधार पाऊसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.हवामान विभागाच्या वतीने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबईच्या उपनगर मध्ये देखील सर्वत्र आज मुसाळधार व मध्यम पाऊस पडेल.