Home Breaking News लग्नासाठी निघालेल्या कुटूंबांवर विघ्न,कार अपघातात आईसह डॉक्टर मुलाचा मृत्यू

लग्नासाठी निघालेल्या कुटूंबांवर विघ्न,कार अपघातात आईसह डॉक्टर मुलाचा मृत्यू

103
0

पुणे दिनांक ३० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील उड्डाणपुलावर शनिवारी रात्रीच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला आहे. लग्नासाठी रायपूरवरुन नागपूरच्या दिशेने निघालेल्या कुटूंबावर विघ्न आले.व काळाने घाला घातला दरम्यान सुसाट कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने कार थेट उड्डाणपुलाच्या कठाड्याला धडकून झालेल्या भीषण अपघातात आईसह डॉक्टर मुलाचा मृत्यू झाला आहे.यात मृत्यू झालेल्यांची नावे १) डाॅक्टर सुजय गजभिये ( वय ५२ रा.रायपूर) २)कांता गजभिये ( वय ८५ रा.रायपूर) अशी आहेत.तर यात शिवान सुफल गजभिये (वय.१४ रा.रायपूर) या प्रमाणे आहेत.

दरम्यान या भीषण अपघातानंतर रायपूर भागात सर्वत्र हळहळ व्यक्त करत आहेत.दरम्यान या अपघाता बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.डाॅक्टर सुफल गजभिये हे त्यांच्या आई व मुलासह कार नंबर सी.जी.०४.एच.जे.४४८४ या कारने मोठ्या भावाच्या मुलाच्या लग्नाकरीता कारने रायपूर येथून नागपूरला जात असताना साकोली उड्डाणपूलाच्या खाली पाणी साचले होते.त्यामुळे कार वरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने व कार भरघाव वेगाने जात असताना कार स्लीप होऊन दुभाजकला धडकून अपघात झाला या अपघातात डॉ.सुफल व त्यांच्या आई कांता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.तर अपघातात शिवान हा गंभीर रित्या जखमी झाला असून त्याचावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान या अपघाता नंतर रायपूर येथे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleबीड जिल्ह्यातील परळीत गोळीबार, अजित पवार गटाच्या सरपंचाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर रित्या जखमी
Next articleमुंबईत ‘रेड अलर्ट ‘ पुण्यात यलो अलर्टसह अन्य जिल्ह्यांत अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here