पुणे दिनांक ३० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील धबधब्यात बुडालेल्या पाच जणांच्या पैकी दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत.या मृतात एक महिला व एक लहान मुलाचा समावेश असून अन्य तीन जणांचे मृतदेहाचा शोध रेस्क्यू टीम शिवदुर्ग व पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत.पुण्यातील हडपसर येथील सय्यदनगर येथील अन्सारी कुंटुंब हे लोणावळा येथील भुशी डॅम येथे वर्षा विहारा करीता आले होते.भुशी डॅम घ्या पाठीमागील डोंगरातील धबधबा येथे पाय घसरून एक महिला व चार लहान मुले हे पाय घसरून पाण्यात वाहून गेले होते.अशी माहिती पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.