पुणे दिनांक ३० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) वर्षाविहारा करीता लोणावळा येथे आलेल्या एकाच कुटुंबातील पाच पर्यटकांचा बॅक वॉटर मध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली समोर येत आहे. दरम्यान आज रविवार असल्याने येथे अनेक पर्यटक येथे भुशीडॅमवर आले होते.या ठिकाणी पाऊस झाल्याने भुशी डॅमच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. दरम्यान येथील बॅक वॉटर मध्ये बुडालेल्या मध्ये १ महिला व ४ लहान मुलांचा समावेश आहे.असे एकूण ५ जण बेपत्ता आहेत
दरम्यान या ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलीस व रेस्क्यू टिम घटनास्थळी दाखल झाले असून.त्यांच्या कडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.दरम्यान या भागात पाऊसाची सतत धार असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे.बुडालेल्या पर्यटकांमध्ये १ महिला व ४ लहान मुलांचा समावेश आहे.अजून या लोकांचा अद्याप पत्ता लागला नाही.हे पुण्यातील असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.ढबढब्या वर पाय घसरून ते पडले आहे.अशी माहिती पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.