Home Breaking News कोरोनामध्ये २००मृत रुग्णांना जिवंत दाखवून ‘त्यांच्या टाळूवरीलवरील लोणी खाणा-या व कोट्यवधी रुपये...

कोरोनामध्ये २००मृत रुग्णांना जिवंत दाखवून ‘त्यांच्या टाळूवरीलवरील लोणी खाणा-या व कोट्यवधी रुपये लाटणारे.आमदार गोरेंवर गंभीर आरोप, उच्च न्यायालयात याचिका दाखल?

54
0

पुणे दिनांक १जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)कोरोना काळात भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांनी तब्बल २०० मृत रुग्णांना जिवंत दाखवून ‘त्यांच्या टाळूवरील लोणी खाणा-या ‘व कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील मायणी तालुका खटाव येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे.व सदरच्या याचिकात म्हणले आहे की.सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणी येथे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आहे.दरम्यान कोरोना काळात हे सेंटर सातारा जिल्हाधिकारी यांनी कोरोना ग्रस्तांचे रुग्ण यांच्यावर उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले होते.दरम्यानच्या काळात या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे हे होते.याकाळात डॉक्टर यांच्या खोट्या सह्या तसेच बनावट कागदपत्रे तयार करून राज्य सरकार व केंद्र सरकारच्या योजनां चा गैरफायदा घेण्यात आला.याकाळात भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांनी चक्क २००मृत रुग्णांना जिवंत दाखवून मृत रुग्णांच्या नावांवर कोट्यवधी रुपये लाटले आहेत.तसेच २०० हून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून विविध सरकारी योजनांमधून निधी मिळविण्यात आला आहे. सरकारने मोफत कोरोना उपचारासाठी सर्व रुग्णालय .कोरोना सेंटर यांना मोठ्या प्रमाणावर औषध व इंजेक्शन पुरवली होती.मात्र आमदार गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनाग्स्तंकडून उपचाराचे पैसे उकळले असे गंभीर आरोप करण्यात आले आहे.दरम्यान कोरोना काळात कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे व त्यांच्या पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास उच्च न्यायालयाच्या सेवा निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली व्हावा,अशी विनंती या याचिकेतून करण्यात आली आहे.या याचिका वर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर दिनांक ५ जुलै शुक्रवारी होणार आहे.यामुळे आता भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Previous articleलोणावळ्यातील भुशी डॅम मध्ये बुडालेल्या दोन जणांचे मृतदेह सापडले
Next articleपुणे पोर्शेकार अपघात प्रकरणी नवीन अपडेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here