Home Breaking News दारु पार्टी साठी वैतरणा धरणावर गेलेल्या पाच मित्रांपैकी दोनजण गेले वाहून

दारु पार्टी साठी वैतरणा धरणावर गेलेल्या पाच मित्रांपैकी दोनजण गेले वाहून

109
0

पुणे दिनांक १ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणावर पाच मित्र हे दारु पार्टी करण्यासाठी गेले होते यातील दोनजण वाहून गेले असून तर एक जणाला स्थानिक नागरिकांनी वाचविले आहे.दरम्यान या घटने बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रविवार सुट्टी असल्याने पाच मित्र दारु व मटणाची पार्टी करण्यासाठी रविवारी दुपारी धरणाच्या खाली गेले होते.संध्याकाळी धरणाच्या वाहत्या पाण्यात उतरल्यावर पाच मित्रांपैकी दोन जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.दरम्यान वाहून गेलेल्या दोन जणांपैकी एकाला स्थानिक नागरिकांनी जखमी अवस्थेत बाहेर काढलेतर यात एकाचा मृत्यू झाला आहे.त्याचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला आहे.

Previous articleपुणे पोर्शेकार अपघात प्रकरणी नवीन अपडेट
Next articleमुंबईत तब्बल १११अनधिकृत बार ढाबे टप-यांवर बुलडोझर कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here