Home Breaking News पुणे ते सोलापूर महामार्गावर कारचा टायर फुटल्याने भीषण अपघातात ४ जण घटनास्थळीच...

पुणे ते सोलापूर महामार्गावर कारचा टायर फुटल्याने भीषण अपघातात ४ जण घटनास्थळीच ठार.१ जण गंभीर रित्या जखमी

65
0

पुणे दिनांक २ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे ते सोलापूर महामार्गावर भरघाव वेगाने जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात ४ जण घटना स्थळीच ठार झाले आहेत.तर एकजण गंभीर रित्या जखमी झाला आहे.सदरचा अपघात हा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डाळज क्रमांक २ येथे झाला आहे.सदरचा अपघात एवढा भीषण होता की यातील कारचा चुराडा झाला आहे.

दरम्यान या अपघातात घटनास्थळीच ठार झालेल्या चारजणांची नावे १) रफिक कुरेशी (वय.३४रा.तेलंगणा २) इरफान पटेल (वय ३४ रा.तेलंगणा) ३) मेहबूब कुरेशी (वय २४.रा.तेलंगणा)४) फिरोज कुरेशी (वय२८ रा.तेलंगणा) असे आहेत.तर जखमी झालेल्याचे नाव सय्यद इस्माईल कुरेशी असे आहे.सदर अपघात प्रकरणी पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार पुणे ते सोलापूर महामार्गावर पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कार क्रमांक टी.एस.०७ जी.एल.२५७४ ही जात असताना कारचा टायर डाळे क्रंमाक २ जवळ फुटल्याने कारने ४ ते ५ पटल्या मारुन कार ड्रेनेज लाईनच्या पोलला धडकून नाल्यात पडून भीषण अपघात झाला यात चारजण घटनास्थळीच ठार झाले तर अन्य एकजण गंभीर रित्या जखमी झाला आहे.अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी 👮 कारमधून ठार झालेल्या चारजणांना व जखमी झालेल्या एकाला बाहेर काढले आहे.अपघातामधील सर्वजण हे तेलंगणा राज्यातील नारायणखेडा येथील रहिवासी असलेल्याची माहिती मिळत आहे.

Previous articleविधानसभेच्या पाय-यांवर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचे आंदोलन
Next articleलालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here