पुणे दिनांक ४ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा एकदा दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान एक आठवड्यानंतर नंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.मात्र पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान एका आठवड्यात अडवाणी यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.