पुणे दिनांक ५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महिलांनी अर्ज करण्यासाठी तुफान गर्दी सेतू कार्यालयात केली आहे.परंतू या महिलांना अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत.तर काही महिलांचे अद्याप बॅंकेत अद्याप खाते नाही.यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी फक्त १०० रुपयांत महिलांना बॅंक खाते उघडून देण्याची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान १०० रुपये भरून पुणे जिल्ह्यातील बॅंकेच्या कुठल्याही शाखेत खाते उघडता येणार आहे.