Home Breaking News मुंबई व पुण्यात येत्या काही तासांमध्ये अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता,कोकणपट्यात जोर वाढणार

मुंबई व पुण्यात येत्या काही तासांमध्ये अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता,कोकणपट्यात जोर वाढणार

41
0

पुणे दिनांक ५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत व पुण्यात येत्या काही तासांमध्ये अति मुसाळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने अंदाज वर्तविण्यात आला आहे.दरम्यान आज शुक्रवार सकाळपासून मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहे.ही परिस्थिती येत्या काही तासांमध्ये बदलू शकते.दरम्यान मागील जून महिन्यात महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला न झाल्याने शेतकरीवर्ग हा वरुणराजाची कृपा आपल्यावर कधी होणार याकडे डोळेलावून बसलेला आहे.तसेच धरणक्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस न झाल्याने धरणे देखील अद्याप पूर्णपणे भरलेली नाहीत.

दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिना हा पावसाचा असेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.तसेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार दिवस पाऊस पडत असला तरी तो विनाखंड झालेला नाही.अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.दरम्यान हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ०.८ मिली मिटर पावसाची तर सांताक्रूझ क्रेंदात २.१ मिमी मिटर पावसाची नोंद झाली आहे.मात्र आज शुक्रवार पोषक वातावरण असल्याने मुंबईत मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.याचा काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.दरम्यान येत्या काही तासांमध्ये मुंबईसह ठाणे तसेच पालघर.जिल्ह्यात मुसळधार तर पुणे तसेच कोल्हापूर भागात अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता आहे.तसेच चंद्रपूर गडचिरोली तसेच वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यात मध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा इशारा कायम आहे.तसेच विदर्भ व मराठवाड्याचा काही भाग वगळता उर्वरीत ठिकाणी सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता असेल.अशी माहिती हवामान खात्याच्या वतीने देण्यात आली आहे.

Previous articleलालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल
Next articleआज शुक्रवार दर्श अमावास्या,सुर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here