Home Breaking News अमरावती एक्स्प्रेस मध्ये अडकले १० ते १२ आमदार, मदत पुनर्वसन मंत्र्यांचा देखील...

अमरावती एक्स्प्रेस मध्ये अडकले १० ते १२ आमदार, मदत पुनर्वसन मंत्र्यांचा देखील समावेश

117
0

पुणे दिनांक ८जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत मध्यरात्री १ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ६ तास ३०० मिली मीटर पाऊस झाला आहे.त्यामुळे रेल्वे लाईनवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.व त्या पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी रेल्वे रुळावर आहे.त्यामुळे त्या पाण्याचा फटका रेल्वे एक्स्प्रेसला झाला आहे.दरम्यान आज मुंबईत अधिवेशन सुरू असल्याने विदर्भ व मराठवाड्यातील आमदार हे अमरावती रेल्वे एक्स्प्रेसने जात असताना सदरची रेल्वे ही कुर्ला स्थानकांवर थांबण्यास आली आहे.

दरम्यान या रेल्वे एक्स्प्रेस मध्ये १० ते १२ आमदार अडकले आहेत.यात मुख्य म्हणजे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा समावेश आहे.यात आमदार संजय गायकवाड व अमोल मिटकरी यांच्या समवेत अनेक आमदार आहेत.दरम्यान हे सर्व आमदार हे आपल्या गावी शनिवारी संध्याकाळी गेले होते.ते आज अधिवेशनला आज सकाळी अमरावती रेल्वे एक्स्प्रेसने जात होते.दरम्यान बरेच आमदार व मंत्री हे पाऊसा मुळे अडकल्याने आज अधिवेशन हे दुपारी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे. तर कोल्हापूर वरुन मुंबईकडे जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस ही अंबरनाथ रेल्वे स्थानकावर रोखण्यात आली आहे. तसेच नागपूर विमानतळावर पाच आमदार अडकले असल्याची माहिती मिळत आहे.पावसाचा फटका आज अधिवेशनाला जाणाऱ्या सर्वच आमदार व मंत्री तसेच शासकीय अधिकारी यांचा देखील यात मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.एकंदरीत या पावसाचा फटका अधिवेशनला बसला आहे.

Previous articleपुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना पुण्यात खळबळ, अज्ञात वाहनाने मध्यरात्रीच्या सुमारास दोन बिट मार्शल पोलिसांना चिरडले
Next articleपुणे ठाणे मुंबई सिंधुदुर्ग-रत्नागिरी शाळा व कॉलेजला आज पावसामुळे सुट्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here