पुणे दिनांक ८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.जुन्या पुणे ते मुंबई महामार्गावर बोपोडी भागात हॅरिस ब्रिज येथे घडली आहे.भरघाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहन चालकांने या दोघा पोलिसांच्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका पोलिसाचा घटना स्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर रित्या जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या दुर्घटना बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचारी यांचे नाव समाधान कोळी असे आहे.तर गंभीररीत्या जखमी झालेल्या दुसऱ्या पोलिस कर्मचारी यांचे नाव पी.सी.शिंदे असे आहे.त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाता नंतर वाहन चालक हा फरार झाला आहे.दरम्यान या अपघातानंतर या भागात एकच खळबळ उडाली आहे.अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.व त्यांनी मृत कोळी यांचा मृतदेह पोस्टमार्टम करीता ससून रुग्णालयात दाखल केला आहे.दरम्यान या अपघातातील हे दोन पोलिस कर्मचारी हे बिट मार्शल असून ते रात्रीच्या सुमारास बोपोडी येथील हॅरिस ब्रिज जवळ गस्तीवर असताना अज्ञात वाहन चालकांने त्यांच्या दुचाकीला चिराडून फरार झाला आहे.दरम्यान या अपघाताची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत.दरम्यान या अपघातानंतर सर्व पोलिस कर्मचारी हे हळहळ व्यक्त करत आहे.