Home Breaking News कल्याण येथील ६३ एकर जमीन बिल्डरच्या घशात ७ हजार कोटींचा महाघोटाळा ,...

कल्याण येथील ६३ एकर जमीन बिल्डरच्या घशात ७ हजार कोटींचा महाघोटाळा , विजय वडेट्टीवार यांचा महायुतीच्या सरकारवर गंभीर आरोप

130
0

पुणे दिनांक ११ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कल्याण येथे मोठा जमीन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सदनात केला आहे.यावेळी ते सदनात म्हणाले की कल्याण तालुक्यातील मौजे म्हारळ एका कंपनीने शासकीय जमीन अनाधिकृतपणे बिगरशेती केली.म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेला हाताशी धरून.गरीब व गरजवंत शेतकरयांची फसवणूक करुन सुमारे ७ हजार कोटी रुपयांचा सुनियोजित घोटाळा जिल्हाधिकारी ठाणे व महसूल विभागातील अधिकारी यांच्या संगनमताने केला आहे.

या जमीन महाघोटाळ्याची चौकशी एका महिन्याच्या आत करावी व म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेला दिलेली ६३ एकर जमीन महसूल विभागाने ताब्यात घ्यावी.अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.आज गुरुवारी विधानसभेत यांनी पाॅईंट ऑफ इनफाॅर्मेशनच्य अनुषंगाने सभागृहाचे या विषयाकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान या प्रकरणी बोलताना ते म्हणाले की म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेने सन २००८ रोजी  फक्त १२ दिवसातच हा भुखंड महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने अटी व शर्तीचा भंग करुन या कंपनीला फक्त ४ कोटी रुपयांना विकला.शासकिय देय रक्कम १ कोटी ६८ लाख ९३ हजार १४० या कंपनीने सारस्वत बँक खात्यातून जमा केलेली आहे. याचाच अर्थ शासनाची जमीन सुनियोजित मार्गाने म्हारळ सामुदायिक शेती संस्थेला समोर करुन या कंपनीने बळकवली आहे.या जमीनीचे व्हॅल्युएशन कमी दाखवून फक्त साडेचार कोटी रुपयात ही जमीन बिल्डरच्या घशात घातली आहे.यातून तब्बल ३० हजार कोटी रुपये बिल्डर कमवणार आहे.या प्रकरणी महसूल मंत्र्यांकडे सुनावणी झाली आहे. त्यात एक सदस्यीय समिती नेमू आणि चौकशी करु असे महसूल मंत्री यांनी सांगितले आहे.मात्र या प्रकरणी तीन महिने उलटून गेले आहेत.तरी अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही.त्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.त्यामुळे सदरच्या प्रकरणात महसूल मंत्र्यांच्या आदेशानुसार एक महिन्याचा आत चौकशी करण्यात यावी.तसेच अटी व शर्तीचा भंग झाल्यामुळे जमीन परत महसूल विभागाकडे जमा करावी.अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सदनात केली आहे.

Previous article‘… तर मी विधानसभेला १५ ते २० उमेदवार लढवणार ‘बच्चू कडू
Next article‘छगन भुजबळांकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न ‘ तर गिरीश महाजन आंदोलन फोडतात, मनोज जरांगे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here