Home Breaking News पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला

पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला

134
0

पुणे दिनांक १६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पंढरपुर येथून एक मोठी अपडेट हाती आली असून.पंढरपुरात अखिल भारतीय होलार समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला यावेळी होलार समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यासमोर यावेळी जोरदार घोषणाबाजी केली आहे.यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त पुजेसाठी पोहोचले आहेत.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात दाखल झाल्यानंतर अखिल भारतीय होलार समाजाने मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला.पंढरपुर शहरातील प्रबोधनकार ठाकरे चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला व यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनासमोर घोषणाबाजी केली.आर्थिक विकास महामंडळ व अभ्यास आयोगासाठी होलार समाजाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.आषाढी यात्रेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

Previous articleमुंबईत रेल्वे ट्रॅकवर मुसळधार पावसाने झाड पडल्याने लोकलवर परीणाम
Next articleविठुरायाला महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे, शेतकरयांना सुखी समाधानी राहू दे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं साकडं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here