पुणे दिनांक २२ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आज शिवाजीनगर येथील न्यायालयाने सुनावली आहे.आज त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर पौड पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.दरम्यान मनोरमा खेडकर यांनी मुळशी येथील जमीन प्ररकणी शेतकऱ्यांला पिस्तूलचा धाक दाखवून धमकवल्या प्रकरणी त्यांच्यावर पौड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान फरार झालेल्या मनोरमा खेडकर यांना पौड पोलिसांनी रायगड येथील एका हाॅटेल मधून अटक केली होती.पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या पुण्यातील बाणेर येथील बंगल्यामधून एक पिस्तूल व काही काडतुसे जप्त करण्यात आली होती.तसेच त्यांनी गुन्ह्यांच्या वेळी वापरण्यात आलेली कार देखील पौड पोलिसांनी 👮 जप्त केली आहे.दरम्यान आज मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्या नंतर त्यांनी जामीना करीता अर्ज न्यायालयात दाखल केला आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.