पुणे दिनांक ८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी आज वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत आज सादर केले. तसेच हे विधेयक सयुक संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.सदरच्या विधेयकाला विरोधी पक्षांनी विरोध करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने जेपीसीत यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.दरम्यान या विधेयकामुळे कोणत्याही धार्मिक संस्थेच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप केला जाणार नाही.असे रिजिजू यांनी स्पष्ट केले.
दरम्यान वक्फ सुधारणा विधेयक जेपीसीकडे पाठव ण्यांची तयारी सरकारने दर्शवली आहे.सदरचे विधेयक अंमलात आल्यास जिल्हाधिकारी किंवा वक्फ बोर्डाचे उपायुक्त यांना जमीनीचे सर्व्हे करता येणार आहे.राज्य स्तरावरील वक्फ बोर्डात दोन गैर-मुस्लिम प्रतिनिधींची नेमणूक केली जाईल.बोहरा व आगाखानी समृदया साठी वेगळ्या वक्फ बोर्डाची स्थापना केली जाईल. तसेच वक्फ बोर्डाच्या संपत्तीच्या अधिकारासंदर्भात निर्णय घेऊ शकणार नाही.या तरतुदी यात आहे.