पुणे दिनांक ११ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ठाण्यात उध्दव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी गोंधळ घालून त्यांच्या गाडीवर नारळ व शेण फेकणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकूण ४४ कार्यकर्त्यांविरुध्द ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उध्दव ठाकरे व इतर नेत्यांच्या गाड्यांवर हल्ला आणि गोंधळ घातल्याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना रात्री ताब्यात घेण्यात आले होते.रात्री उशिरा त्यांना नोटीसा देऊन सोडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य गोंधळ घालणा-या कार्यकर्त्यांचा आता नौपाडा पोलिस शोध घेत आहेत.