पुणे दिनांक १२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जेष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की.मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी.व सर्वपक्षीय बैठकीत आम्ही आमची भूमिका मांडू तसेच मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आमची सहकार्याची भूमिका असेल. तसेच या बैठकीला ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांना व मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देखील बोलवावे तसेच ५० टक्क्यांवरील आरक्षणाचे धोरण बदलले पाहिजे.केंदाने भूमिका घेतली तर आमची यात समन्वयाची भूमिका असेल.तसेच याप्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलवण्या साठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचवले आहे.तसेच यावेळी होणा-या बैठकीत एकवाक्यता ठेवण्यास सहकार्य करु असे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.