पुणे दिनांक १७ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार राजस्थान राज्यातून एक खळबळजनक घटना घडली असून उदयपूर येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर अचानकपणे हल्ला काही लोकांनी केल्यानंतर उदयपूर शहरातील परिस्थिती चांगलीच चिघळली आहे.सदर च्या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रस्त्यावरील वाहने पेटवून दिली आहेत.व तसेच याभागातील दुकानांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने १४४ चे कलम शहरात लागू केले आहे.तसेच या भागातील शाळा व इंटरनेटचे कनेक्शन बंद केले आहे .रात्री दहा वाजेपर्यंत बंद करण्यात आले आहे. दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा झाल्यानंतर ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.