Home Breaking News पुण्यातील विमाननगर भागातील फिनिक्स माॅल बाॅम्बच्या सहाय्याने उडविण्याची धमकी, पुण्यात एकच खळबळ...

पुण्यातील विमाननगर भागातील फिनिक्स माॅल बाॅम्बच्या सहाय्याने उडविण्याची धमकी, पुण्यात एकच खळबळ पुणे पोलिस अलर्ट

54
0

पुणे दिनांक १९ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुण्यातून एक मोठी अपडेट समोर आली असून पुण्यातील विमाननगर भागातील माॅल बाॅम्बच्या सहाय्याने उडविण्याची धमकी देण्यात आली असून सदरच्या धमकी नंतर आता पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान हिडनस बोन नावाच्या एका व्यक्तीने ई-मेल करुन माॅल मध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी दिली होती.असे अधिकृत सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.तसेच या माॅल मधील कोणीही वाचणार नाहीत.तसेच पोगो व नोरो मला त्रास देत आहेत.असं सदरच्या ई-मेल मध्ये म्हटले आहे.

दरम्यान पुण्यातील विमाननगर भागातील फिनिक्स मार्केट माॅलमध्ये बाॅम्बस्फोट घडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल पाठविण्यात आल्याने चांगलीच घबराट  उडाली होती.दरम्यान यानंतर विमाननगर पोलिसांनी 👮 धमकीचा ईमेल पाठविणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा  तांत्रिक तपास सुरू केला असून धमकीचा ईमेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत.

Previous article‘ महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी काहीतरी उलथापालथ होणार ‘ प्रकाश आंबेडकर
Next articleनाशिक मधून तीन बांगलादेशी नागरिकांच्या एटीएसच्या टीमने आवळल्या मुसक्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here