पुणे दिनांक २३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाविकास आघाडीच्या वतीने उद्या शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. पण बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.त्या याचिकेवर आज तातडीने सुनावणी झाली व उच्च न्यायालयाने उद्याचा बंद हा बेकायदेशीर ठरवत राज्य सरकारला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर जेष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना ट्विट केलं आहे.तसेच सदरच्या ट्वीटच्या माध्यमातून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान जेष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हणाले आहे की ” बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवारी दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते.त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता.परिणामी समाजातील सर्व स्तरातून याबाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता.तथापी मुंबई उच्च न्यायालय यांनी सदर निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही.भारतीय न्याय व्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते “.असं जेष्ठ नेते शरद पवार यांनी म्हणाले आहेत.दरम्यान यावर आता शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे गट हे सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.तर काॅग्रेस पक्षाची भूमिका अद्याप समजू शकलेली नाही.