पुणे दिनांक २८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार हिंगोली येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा सुरू होती . दरम्यान या सभेत राडा झाला आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.दरम्यान या सभेत अजित पवार यांचे भाषण सुरू असताना मराठा समाजाचे आ़दोलंक मोठ्या संख्येने सभेच्या ठिकाणी पोहोचले यावेळी त्यांनी प्रचंड प्रमाणावर घोषणाबाजी सुरू केली.पोलिसांनी त्यांना यावेळी रोखण्याचा प्रयत्न केला.पण यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी आम्हाला अजित पवार यांना निवेदन द्यायचे असे सांगितले पण त्यानंतर देखील घोषणाबाजी सुरू होती यावेळी पोलिसांनी 👮 आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला असल्याची माहिती मिळत आहे.