Home Breaking News खासदार वर्षा गायकवाडांना पोलिसांनी घरातच केले स्थानबद्ध

खासदार वर्षा गायकवाडांना पोलिसांनी घरातच केले स्थानबद्ध

51
0

पुणे दिनांक ३० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)  काॅग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौ-यावर आले आहेत.दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज काॅग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काॅग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आंदोलन करण्यात येणार होते.याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी 👮 खासदार वर्षा गायकवाड यांना त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्ध केले आहे.त्या आंदोलनावर ठाम असून त्यांनी त्यांच्या सोसायटी समोर आता कार्यकर्ते यांच्या समवेत आंदोलन सुरू केले आहे.

Previous articleआईच्या प्रियकरानेच केला १४ वर्षीय मुलीवर लौकिक अत्याचार
Next articleकाॅग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here